Nitin Gadkari : ''काम व्यवस्थित करत नसलेल्या...'' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणाचे टोचले कान?

Parbhani Nitin Gadkari Sabha: काम व्यवस्थित करीत नसलेल्या कंत्राटदारांची तक्रार जरूर करा पण ब्लॅकमेलिंगसाठी (Blackmail) कुणाची तक्रार करू नका असा टोला गडकरी यांनी लगावला पण रोख खासदारांकडे जात असल्याचे बघून मी देशातील लोकप्रतिनिधींना बोलत असल्याचे गडकरी म्हणाले. त्यांचा नेमका रोख कुणाकडे होता? 

Updated: Feb 25, 2023, 11:22 PM IST
Nitin Gadkari : ''काम व्यवस्थित करत नसलेल्या...'' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणाचे टोचले कान?  title=

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज परभणी येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी परभणी (Parbhani Nitin Gadkari Sabha) येथील विकास कामांचा शुभारंभ केला तर काही नवीन घोषणा केल्या. यावेळी नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधींच्या टक्केवारीवरून जाहीरपणे कान टोचले. यापूर्वी औरंगाबाद येथे सुद्धा नितीन गडकरी यांनी मराठवाड्याचा विकास (Marathawada) मराठवाड्यातील काही लोकप्रतिनिधीमुळेच थांबला असं वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली होती. आज परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रीय महामार्गाचे (National Highway) 7 वर्सगापासून रेंगाळलेल्या कामावरून कंत्राटदारांची जाहीर तक्रार केली होती. याला उद्देशून नितीन गडकरी म्हणाले काम व्यवस्थित करीत नसलेल्या कंत्राटदारांची तक्रार जरूर करा पण ब्लॅकमेलिंगसाठी (Blackmail) कुणाची तक्रार करू नका असा टोला गडकरी यांनी लगावला पण रोख खासदारांकडे जात असल्याचे बघून मी देशातील लोकप्रतिनिधींना बोलत असल्याचे गडकरी म्हणाले. त्यांचा नेमका रोख कुणाकडे होता? (Nitin gadkari parbhani sabha union minister Nitin Gadkari says road complaints are not meant to be blackmailing)

''जे कंत्राटदार व्यवस्थित काम करीत नाहीत त्यांची तक्रार जरूर करा, पण ब्लॅकमेल करण्यासाठी कुणाची तक्रार करू नका, जे कंत्राटदार व्यवस्थित काम करीत नाहीत त्यांना ठोकलच पाहिजेत. 50 लाख कोटी रुपयांची कामे केलीत पण एक ही  कंत्राटदार माझ्या घरी आले नाहीत, क्ललिटीशी तडजोड करू नका, पैसे जरूर कमवा पण कंत्राटदारला ब्लॅकमेलिंग करून पैसे कमाऊ नका'', असं म्हणताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून भारतीय जनता पार्टीचा विजय असो म्हणत एकच घोषणाबाजी केली यावेळी नितीन गडकरी (Nitin Gadkari Latest Speech) यांनी मी जे बोलतो आहे ते सगळ्या देशाकरिता बोलतो आहे, येथे काय चालते मला माहिती नाही, उगाच माझ्या हातून कुणाला टोपी घालू नका असे म्हणत नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधींचे कान टोचले. परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग काम मागील 7 वर्षांपासून रेंगाळत सुरु आहे, अनेकदा या रस्त्यावरील कंत्राटदार काम सोडून गेली आहेत, यावरून नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींचे कान टोचले.

किती कोटी रूपये मंजूर? 

परभणी जिल्ह्यात काळी कसदार जमीन असल्याने परभणी जिल्ह्यात डांबरीकरणाचे रोड टिकत नसल्याने परभणी जिल्ह्यात सिमेंट काँक्रिटीकरनाचेच रस्ते करा असा आदेश नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. आतापर्यंत परभणी जिल्ह्यातील रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून 11 कामे प्रगतीपथावर असल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. यावेळी नितीन गडकरी यांनी तीन रस्त्याच्या कामाच्या कोनशिलेच ऑनलाइन उदघाटन केले. चारठाना ते जिंतूर या महामार्गासाठी 200 कोटी रुपये, गंगाखेड ते लोहा महामार्गासाठी 500 कोटी रुपये, इंजेगाव ते सोनपेठ महामार्गासाठी 200 कोटी, इसाद ते किंनगाव 125 कोटी आणि गोदावरी च्या नदीवरील पुलासाठी 150 कोटी रुपये नितीन गडकरी यांनी मंजूर केलेत, यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांनी आपल्या भाषणातून मागणी केली होती, परभणीसाठी दुसरा बाह्यवळण रस्त्याला मंजुरी देण्यात आली असून गंगाखेड येथे ही बाह्यवळन रस्ता मंजूर करीत असल्याची घोषणा गडकरी यांनी केली.

''आम्ही टॉयलेटच पाणी विकून...''

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सिंचन वाढली पाहिजेत, धरणातील पाणी वापरात आलं पाहिजे, उत्पन्न वाढीसाठी कृषी विद्यापीठाने महत्वाची भूमिका घेतली पाहिजे, परट्या तुरट्या, तनस यांपासून डांबर तयार होते यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला पाहिजेत, बायोटेक्नॉलॉजीपासून बायो उत्पादन करायचा सरकारचा विचार आहे, बांबू पासून बायो इथोनॉल तयार होते त्यामुळे बांबू शेतकऱ्यांनी लावला पाहिजेत, हायट्रोन जे भविष्यातील महत्वाचं इंधन असेल, मी नागपूरचा खासदार आहे, आम्ही टॉयलेटच पाणी विकून आमच्या महानगर पालिकेला वर्षाला 300 कोटी रुपये मिळवून देतो, शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी पाण्याचे नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.