अमर काणे, झी मीडिया, नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयात धमकीचा फोन (Threatening phone call) केल्याप्रकरणी पोलिसांनी बेळगाव जेलमधून (Belgoan Jail) जयेश पुजारी (Jayesh Pujari) या आरोपीला अटक केली आहे. त्याच्या चौकशीत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आरएसएसच्या (RSS) खूप जवळचे आहेत, म्हणून त्यांना धमकीचा फोन केल्याचं जयेश पुजाराने चौकशीत सांगतिलं आहे. तसंच पीएफआयवर (PFI) बंदी घातली मग आरएसएसवर बंदी का नाही? याचा राग त्याच्या मनात होता असंही समोर आलं आहे.
बेळगावच्या तुरुंगात ऐश
धक्कादायक म्हणजे बेळगावच्या तुरुंगात आरोपी जयेश पुजारीची अक्षरश: ऐश सुरु होती. जेलमध्ये त्याला चोवीस मोबाईल आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होती. जयेशला जेलमध्ये व्हीआयटी ट्रीटमेंट (VIP Treatment) मिळाली यासाठी अदृश्य शक्तींनी एका वर्षात 18 लाख रुपये खर्च केल्याचंही तपासात समोर आलं आहे.
धमकीचा फोन का केला?
जयेश पुजारी उर्फ कांथा उर्फ शाकीरने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दोन वेळेला धमकी का दिली असा प्रश्न सर्वांना पडला होता, पोलीस तपासात त्याच्या धमकीच्या मागचं खरं आणि तितकंच धक्कादायक कारण समोर आले आहे. जयेश गेली काही वर्ष तुरुंगात होता. तुरुंगात असताना तो सातत्याने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front of India) वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. याच लोकांनी जयेशच्या मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाचे खास समर्थक म्हणून नितीन गडकरी यांच्या विरोधात प्रचंड विष पेरलं.
जयेश पीएफआयच्या संपर्कात
जेव्हा एक कट्टरवादी आणि देश विघातक संघटना म्हणून पी एफ आय वर बंदी लावली गेली आहे, तेव्हा आरएसएस वर बंदी का नको असा जयेश पुजारी उर्फ शाकीरचा समज असून नागपूर पोलिसांच्या तपासात त्याने गडकरी यांना धमकी देण्यामागे हेच कारण असल्याचं सांगितलं. 2014 मध्ये बेंगलुरु तुरुंगात असताना जयेश PFI च्या एका वरिष्ठ नेत्याच्या संपर्कात आला होता. त्यानेच जयेश उर्फ शाकीरला गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देण्यास आणि खंडणी मागण्यास सांगितलं होतं.
गडकरींच्या कार्यालयात फोन
जयेश पुजारीने नितीन गडकरी यांच्या कार्यालयात लागोपठा तीन कॉल केले होते. नितीन गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात त्याने हे फोन केले. पहिल्या कॉलमध्ये बोलणं झालं नाही, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉलमध्ये त्याने आपण जयेश पुजारी बोलत असल्याचं सांगितलं. यात त्याने 10 कोटी रुपयांची मागणी केली,तसंच पोलिसांकडे याची वाच्यता करु नका असा इशाराही जयेश पुजारीने दिला होता.