पुणे : या वर्षीचा ऊस हंगाम तुलनेनं कमी असल्यानं बाहेरच्या राज्यात ऊस निर्यातीला बंदी घालण्यात आल्याचं, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलंय. पुण्यातल्या स्वस्त दरातील लाडू चिवडा विक्री या उपक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते.
१ नोव्हेंबरपासून ऊस गाळप सुरु होणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. टेक्सटाईल पार्कच्या बाबतीत आपण कोणतीही चूक केलेली नसून आपल्या मतदार संघातील नागरिकांना रोजगार मिळावा हीच त्यामागील भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ज्यांना आपण चूक केलीय असं वाटतंय, त्यांनी चिंतन करावं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.