मुंबई-पुणे महामार्गावर दिरंगाई, ठेकेदाराला नोटीस

 प्रवाशांना जीव मुठीत घेऊन इथून प्रवास करावा लागतोय 

Updated: Jul 18, 2018, 01:45 PM IST
मुंबई-पुणे महामार्गावर दिरंगाई, ठेकेदाराला नोटीस title=

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर पुलांच्या बांधकामात दिरंगाई केल्याबद्दल ठेकेदाराला नोटीस बजावण्यात येणार आहे. नागपूरच्या 'मेसर्स खरे अॅन्ड तारकोंडे पाटील अॅन्ड कंपनी'कडे पुलाचं काम आहे. 'झी २४ तास'नं याबाबतची बातमी काल दाखवली होती. त्यानंतर ठेकेदाराला नोटीस बजावण्याची कारवाई केली जाणार आहे.

'झी २४ तास'च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आलीय. मुंबई-गोवा महामार्गावर एकूण १२ पूल आणि दोन रेल्वे ओव्हर ब्रिजचं ठेकेदाराकडे काम आहे. 

महामार्गावरचे ब्रिटिशकालीन पूल मोडकळीस आल्यानं चौपदरीकरणाच्या कामात नव्या पुलांची उभारणी सुरू आहे. पण अनेक पुलांचे बांधकाम रेंगाळलंय.  

त्यामुळं अजूनही धोकादायक पुलांवरून वाहतूक सुरू आहे. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन इथून प्रवास करावा लागतोय.