पाचवी ते आठवीची परीक्षा न घेण्याची पद्धत बंद होणार

पाचवी ते आठवीची परीक्षा न घेण्याची पद्धत बंद करण्यात येणार आहे.

Updated: May 21, 2018, 02:27 PM IST

पुणे : पाचवी ते आठवीची परीक्षा न घेण्याची पद्धत बंद करण्यात येणार आहे. येत्या अधिवेशनात याविषयी विधेयक आणणार असल्याचं मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय. परीक्षा सुरू केल्या तरी अभ्यासक्रम कमी करणार असल्याचं ते म्हणाले. तसंच विद्यापीठातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार असल्याचं ते म्हणाले. पुढील १० वर्षात देशातली २० विद्यापीठं जगातल्या पहिल्या शंभर विद्यापीठात येतील या दृष्टीने धोरण आखणार असल्याचं जावडेकर म्हणाले. पाचवी ते आठवीपर्यंतच्या परीक्षा घेणे हे काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आलं होतं, ते आता पुन्हा नव्याने सुरू करण्यात येणार आहे. शिक्षण पद्धतीत आणखी काही चांगले बदल करण्यात येणार असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी झी २४ तासशी पुण्यात बोलताना म्हटलं आहे.