पुणे : पुण्यातील ससून शासकीय रुग्णालयात मेस्मा लागू करण्यात आला आहे. अशा प्रकारे मेस्मा लागू झालेले ससून हे राज्यातील पहिलंच रुग्णालय आहे. हा कायदा लागू झाल्यामुळे आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पुढील 6 महिने अत्यावश्यक सेवा बंद ठेवता येणार नाहीत. म्हणजेच यापुढच्या काळात कर्मचाऱ्यांना कुठलाच प्रकारचा संप पुकारता येणार नाहीत. काही दिवसांपूर्वी इथल्या परिचारिकांकडून अन्यायकारक बदलीच्या विरोधात संप पुकारण्यात आला होता.
त्या पार्श्वभूमीवर हा सरकारनं हा कायदा लागू केला असल्याचं सांगण्यात येत आहे. शासनाचा हा निर्णय म्हणजे कर्मचारी संघटनांच्या अधिकारांची मुस्कटदाबी असल्याचा आरोप ससूनच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. या निर्णयावर कर्मचारी किंवा कामगार संघटना काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.