OBC आरक्षण बचाव यात्रा; प्रकाश आंबेडकर यांचे खास निमंत्रण छगन भुजबळ स्वीकारणार?

प्रकाश आंबेडकर OBC आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. छगन भुजबळ यांना खास निमंत्रण देण्यात येणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jul 22, 2024, 09:37 PM IST
OBC आरक्षण बचाव यात्रा; प्रकाश आंबेडकर यांचे खास निमंत्रण छगन भुजबळ स्वीकारणार?  title=

Prakash Ambedkar : राज्यात मराठा आरक्षण आणि OBC आरक्षणाचा विषय चांगलाच पेटला आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर   OBC आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) गटाचे नेते तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना प्रकाश आंबेडकर यांनी खास निमंत्रण दिले आहे. 

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी  यांना ई-मेलद्वारे निमंत्रण पाठवले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याची माहिती त्यांच्या एक्स हॅंडलवर पोस्ट करुन दिली आहे. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा  25 जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार आहे. याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे.  तसेच, ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होणाऱ्यासाठी ओबीसी आंदोलकांसह, महाराष्ट्रातील काही बड्या नेत्यांनाही  निमंत्रण पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची तब्येत आता खालावली आहे.. वैद्यकीय पथकाकडून त्यांची तपासणी करण्यात आली.. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री पुजारे यांनी स्वतः त्यांची तपासणी केली.. अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.. मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या माध्यमातून ओबीसीमध्येच आरक्षण द्यावं, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. 

राज्यातलं सामाजिक वातावरण बिघडलं असताना शरद पवार मूग गिळून गप्प पसलेत, असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय. उद्धव ठकरे आणि काँग्रेस नेत्यांनी यावर बोललं पाहिजे असं आवाहन हक्के यांनी केलंय. तर पवारांना आरक्षण द्यायचं नाही, त्यांना मराठा-ओबीसी वाद लावाचाय, असा आरोप भाजपचे ओबीसी नेते आमदार परिणय फुके यांनी केलीय.