कोल्हापूर : old man was robbed at Kolhapur : कोल्हापूर शहरात रहदारीच्या रस्त्यावर भर दिवसा एका वृद्धाला चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. दिवसाढवळ्या कारची टेहळणी केली. गाडीत एकटाच वृद्ध असल्याचे पाहून बनावट नोटा गाडीच्या जवळ टाकल्या. तुमचे पैसे खाली पडल्याचे सांगितले. ते पैसे उचल असताना त्यांच्या गाडीतून बॅगसह काही वस्तू घेत पोबारा केला.
ही घटना कोल्हापूरच्या शाहूपुरी भागात घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. चोरट्यांनी स्वत:च खोट्या नोटा टाकून दरवाजाचे लॅाक काढायला लावून वृद्धाला कार बाहेर यायला लावले. त्यानंतर साईड सीट वर ठेवलेली बॅग आणि मोबाईल हळूच दार उघडून चोरट्यांनी लंपास केले. दरम्यान, चोरी करण्यापूर्वी चोरांनी 2-3 वेळा गाडीभोवती फेऱ्या मारुन टेहळणी केली होती.
पाहा हा व्हिडिओ :