बस उड्डाणपुलावरून थेट घरांवर कोसळली; १० जखमी; २ गंभीर

 अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. 

Updated: Jul 2, 2018, 12:41 PM IST
बस उड्डाणपुलावरून थेट घरांवर कोसळली; १० जखमी; २ गंभीर title=

पुणे: वारजे-कात्रज बायपासजवळ अत्यंत विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात बस चक्क उड्डाणपुलावरून घरांवर कोसळली. यात १० प्रवासी जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. 

कात्रज-वारजे बायपासवरील घटना

प्राप्त माहितीनुसार, ही बस वारजे कात्रज बायपास मार्गावरील एका उड्डाणपुलावरून निघाली होती. दरम्यान, ही बस उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळली. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने तेथे पत्र्याची शेड असलेली कामगारांची घरे आहेत. ही बस थेट त्या पत्र्यांच्या घरावच कोसळली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. 

अपघाताचे कारण अस्पष्ट

दरम्यान, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा अशी चर्चा आहे. मात्र, अपघाताचे कोणतेही कारण अद्याप पुढे आले नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, त्यांनी अपघाताची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे. दरम्यान, जखमींना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.