Kolhapur Shahi Dasara Melawa : विजयादशमीनिमित्त आज कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात तयारी सुरु झालेली आहे. कोल्हापुरातील शाही दसरा सोहळ्या हा देशातील सर्वात लोकप्रिय दसरा सोहळा मानला जातो. देशातील म्हैसुर पाठोपाठ कोल्हापुराचा शाही दसरा जास्त प्रसिद्ध आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरात या शाही सोहळ्याची परंपरा पार पडत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील हा शाही सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. 3 ऑक्टोबर पासून 12 ऑक्टोबर दरम्यान जिल्हा प्रशासनाने दसऱ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
दोन दिवसांपासून शाही दसरा सोहळ्याची तयारी सुरु
या शाही दसरा सोहळ्यामध्ये खंडेनवमीचे शस्त्रपूजन करण्यात येणार आहेत. तसेच त्यानंतर परंपरेनुसार करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीची पालखी सायंकाळी 6 वाजेपर्यंत चौकात येणार आहे. याच ठिकाणी छत्रपती घराण्यातील मान्यवर देखील या शाही दसऱ्याला उपस्थित राहणार आहे. यामध्ये छत्रपती घराण्याचे मानकरी तसेच प्रशासनातील प्रमुख अधिकारी आणि कोल्हापूरचे सर्व नागरिक उपस्थित असणार आहे. हा शाही दसरा पाहण्यासाठी लाखो लोक कोल्हापूरात गर्दी करत असतात. या शाही दसरा सोहळ्याची गेल्या दोन दिवसांपासून तयारी सुरु आहे.
सोने खरेदी करण्यासाठी सराफ बाजार सुरु
विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात. त्याबरोबर अनेक जण नवीन वस्तू किंवा गाड्या खरेदी करत असतात. यामुळे विजयादशमीला सोने-चांदी अशा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची ही जुनी परंपरा आजही टिकून आहे. त्यामुळेच नेहमी प्रमाणे कोल्हापुरातील सराफ बाजार हा शनिवारी बंद असतो. मात्र, विदयादशमीनिमित्त हा सराफ बाजार सोने खरेदी करण्यासाठी आज सुरु ठेवण्यात येणार आहे. कोल्हापुरात वाहन किंवा इतर मौल्यवान वस्तू असणाऱ्या बाजारपेठाही सजवण्यात आल्या आहे. या बाजार पेठांना आज आनोखे रुप आले आहे.