सोलापूर : मतदान झाल्यावर तुमची वीज बंद नाही केली तर माझे नाव बदला असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.विजेची वसुली म्हणजे मुगलाच्या काळातील जिझिया कराप्रमाणे वसुली झालीय. निवडणूक असल्याने या मतदारसंघात वीज बिल वसुली बंद असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारचा दुराचार चव्हाट्यावर आणून आपली नापसंती दाखवा असे आवाहन फडणवीस यांनी सोलापूरच्या जनतेला केले. मतदारसंघाची निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय.
राज्य सरकारने ५ हजार कोटी रुपयांची वसुली 2 महिन्यात केली. मुंबईतील बिल्डरला वीज बिलात ५ हजार कोटी रुपयांची सूट दिली. कारण त्यांना बिल्डरकडून माल पाणी मिळालं असावं असे फडणवीस म्हणाले.
हे लोक हितविरोधी सरकार आहे. सत्तेवर आल्यावर महाविकास आघाडी सरकार होतं पण आता हे महावसुली सरकार आहे. जिथे मिळेल तिथे फावड्याने माल खा एवढच कामं आहे. हे देशातील सर्वात अधिक रुग्ण असलेलं राज्य असल्याचे फडणवीस म्हणाले.
एकट्या महाराष्ट्रात ५५% मृत्यू होत आहेत. महाराष्ट्रात लॉक शाही आहे. लॉकडाऊन करताना ज्यांचे पोट बंद होत त्यांना मदत करणे गरजेचे आहे. छत्तीसगड राज्याने तेथील शेतकऱ्यांना मदत केली. पण इथे सावकारीपेक्षा जास्त सावकारी पाहायला मिळाली.
अजित पवार, जयंत पाटील सांगतात हे करू ते करू पण हे लबडाचं अवतान आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून सरकारला जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे. भारत भालके काँग्रेस आमदार असताना मी मुख्यमंत्री असताना त्यांच्या साखर कारखान्याला मदत केली. पण आता हा विठ्ठल साखर कारखाना कर्जा पोटी बुडेल अशी अवस्था आल्याचे ते म्हणाले.
देशात मोदी यांचे सरकार आल्यानंतर सामान्य माणसाला मदत केली. मोदींमुळे ऊस कारखानदारी टिकून आहे. महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी प्रक्रिया भाजप सरकारने केली पण अजित पवार यांनी काही केले नाही असेही फडणवीस म्हणाले.