पाठीवर टॅटू काढून सोळा वर्षीय विद्यार्थ्याची अटलजींना आदरांजली

 अटलजींचं टॅटू काढून कलेच्या माध्यमातून अटलजींना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली.

Updated: Aug 17, 2018, 08:52 PM IST

पालघर : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रीय स्मृती स्थळावर हे अंत्यसंस्कार पार पडले. मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी अटलींना मुखाग्नी दिला. त्यापूर्वी अटलजींना लष्कराच्या ३०० जवानांनी मानवंदना दिली. तीनही सेनादलांकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. अटलींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांना अश्रू अनावर झाले होते. संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. सर्वजण अटलजींच्या आठवणींना उजाळा देत आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर पालघर जिल्ह्यातल्या डहाणूतील दिलीप पटेल या सत्तावीस वर्षीय कलाकारानं अटलजींचं टॅटू काढून कलेच्या माध्यमातून अटलजींना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली.

पाठीवर गोंदवला टॅटू 

टॅटू आर्टिस्ट दिलीप पटेल यांनी हार्दिक कडू या सोळा वर्षीय महाविद्यालयीन तरुणाच्या पाठीवर हा टॅटू गोंदवला. भारताच्या तिरंग्यावर त्यांनी अटलजींची ही प्रतिकृती चितारली. त्यांच्या कुंचल्यातून चेहऱ्यावरील भाव प्रभावीपणे व्यक्त झाले आहेत. हा टॅटू काढण्याकरता त्यांना चार तासांचा अवधी लागला. या टॅटूकरता ऍक्रोलीक इकोफ्रेंडली रंग वापरण्यात आले. 

अटलजींच्या अंत्ययात्रेला दिल्लीत लाखो लोकांनी गर्दी केली होती. एका फुलाने सजवलेला ट्रकवर अटलजींचं पार्थिव होतं, यामागे हजारो नागरिक, कार्यकर्ते धावत होते. अटलबिहारी वाजपेयी यांना निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. अटल बिहारी वाजपेयी यांना निरोप देण्यासाठी भाजपाचे देशभरातील नेते आणि पदाधिकारी कालच दिल्लीत दाखल झाले होते.