Pandharpur Election Result : पंढरपूरमध्ये महाविकासआघाडीला धक्का, भाजपचा विजय

पंढरपुरात पहिल्यांदाच भाजपचा विजय

Updated: May 2, 2021, 06:41 PM IST
Pandharpur Election Result : पंढरपूरमध्ये महाविकासआघाडीला धक्का, भाजपचा विजय title=

पंढरपूर : पहिल्यांदाच पंढरपुरात कमळ फुलले आहे. मतदारसंघाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच भाजपचा विजय झाला आहे. पंढरपूर पोट-निवडणुकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचा 3716 मतांनी विजय झाला आहे. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. (Samadhan Autade win)

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे पंढरपुरात तळ ठोकून होते. तसेच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, उदय सामंत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचार करूनही महाविकास आघाडीला भाजपने धूळ चारली आहे.

महाराष्ट्रातील या पोट-निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पण या मतदारसंघात भाजपला विजय मिळवण्यात यश मिळालं आहे. अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे यांनी बाजी मारली आहे. 

भाजप उमेदवार समाधान आवताडे यांची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देतना म्हटलं की, मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावाचं पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. महाविकास आघाडीला या मतदारसंघाच्या जनतेने उत्तर दिले आहे.

खासदार रणजिततिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं की, पंढरपूर तो अभी झांकी है अभी महाराष्ट्र बाकी है, पंढरपूरचा कार्यक्रम झाला आहे. आता राज्यात सत्तांतर होईल. 

भाजप : समाधान आवताडे : 109450 
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 105717
अपक्ष : शैला गोडसे : 51
अपक्ष : सिद्धेश्वर आवताडे : 10