Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील निकालावर अजित पवारांची तीन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले 'गुलाबी...'

Ajit Pawar on Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राती महायुतीची सत्ता येणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. त्यानंतर अजित पवारांनी एक्सवर पोस्ट शेअर करत तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 23, 2024, 01:38 PM IST
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील निकालावर अजित पवारांची तीन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले 'गुलाबी...' title=

Ajit Pawar on Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राती महायुतीची सत्ता येणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळताना दिसत आहे. त्यानंतर अजित पवारांनी एक्सवर पोस्ट शेअर करत तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 'महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला आहे' (Maharashtra Chooses Pink) असं अजित पवार म्हणाले आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार, महायुतीला 221 आणि महाविकास आघाडीला 50 जागा मिळत आहेत. तसंच अपक्षांना 17 जागा मिळताना दिसत आहेत. 

राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येणार हे मतमोजणीच्या प्राथमिक कलांनंतर स्पष्ट झालं असून महायुतीने विक्रमी जागा जिंकत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. भारतीय जनता पार्टीने तर अभूतपूर्व यश संपादित करत थेट 127 जागांवर आघाडी घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 80 टक्क्यांपेक्षा अधिक स्ट्राइक रेट राखत भाजपाने लढवलेल्या 148 जागांपैकी 127 जागांवर आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे. असं असतानाच आता सर्वात मोठ्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री होणार या सूत्रानुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हा लोकशाहीचा कौल नाही - संजय राऊत

"जो निकाल दिसत आहे त्यावरुन माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला तो म्हणजे काहीतरी गडबड आहे. एकनाथ शिंदे यांना 56 जागा कोणत्या भरवशावर मिळत आहेत. अजित पवारांना 40 च्या वर जागा मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी असे काय दिवे लावले आहेत, की त्यांना 120 च्या वर जागा मिळत आहेत. महाराष्ट्रातील वातावरण, कल ज्या प्रकारे होता ते पाहता हा लोकशाहीचा कौल वाटत नाही. हा मान्य कसा करावा असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेलाही पडला असेल," असं संजय राऊत म्हणाले आहेत.