प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मुंडे भाऊंना बहिणीकडून धक्का

या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते ते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील प्रतिष्ठेपायी...

Updated: Jun 12, 2018, 11:08 AM IST
प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मुंडे भाऊंना बहिणीकडून धक्का  title=

उस्मानाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा वरचष्मा असणाऱ्या लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ सुरेश धस यांच्या विजयाने भाजपने आपल्याकडे खेचून घेतला आहे. राष्ट्रवादीचा हा पराभव काँग्रेस राष्ट्रवादी मधील दुरावा अधिक वाढवणारा ठरणार आहे हे नक्की... शिवाय पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय यांना पुन्हा एकदा धोबीपछाड देत बेरजेच्या राजकारणाची सुरवात केलीय, असं म्हणावं लागेल.

५२७ मते असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तब्बल ७८ मतांनी पराभव पत्करावा लागला... म्हणजेच आघाडीची मोठ्या प्रमाणात मते फुटल्याचं स्पष्ट आहे. 

या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते ते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील प्रतिष्ठेपायी... बहिण-भावाने ही निवडणूक वैयक्तिक घेत प्रतिष्ठेची केली होती. भाजपचे रमेश कराड यांना राष्ट्रवादीत घेत धनंजय यांनी धक्का दिला तर त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावून पंकजा यांनी धनंजय यांच्यावर कुरघोडी केली होती.

कमी मतदान असतानाही भाजपने काँग्रेस राष्ट्रवादी एम आय एम यांची मतं फोडत राष्ट्रवादीला धक्का दिला आहेत.