क्रुरतेचा कळस! उड्डाणपुलाखाली सापडला महिलेचा लटकलेला मृतदेह

Panvel News: सध्या खून मारामारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यातून आता एक गंभीर बातमी (shocking news) समोर येते आहे. पनवेल येथे धामणी उड्डाणपुलाखाली एका महिलेचा मृतदेह सापडला असून या महिलेची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाच आहे. या घटनेमुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

Updated: Dec 16, 2022, 03:54 PM IST
क्रुरतेचा कळस! उड्डाणपुलाखाली सापडला महिलेचा लटकलेला मृतदेह title=
panvel news

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई: पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळील उड्डाण पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह (Dead Body) सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पनवेल (Panvel News) तालुका पोलिसांनी व्यक्त केला आहे. पनवेल तालुक्यातील धामणी उड्डाण पुलाखाली असलेल्या पिलरला एका महिलेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. पोलीसांनी घटनास्थळी जात मृतदेहाला बाहेर काढले. पोलिसांनी या महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून आजूबाजूच्या गावातील बेपत्ता व्यक्तींची माहिती काढण्यात येते आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Panvel News Body of woman found under flyover in Panvel Crime New Marathi)

काय घडला नक्की प्रकार? 

नवेल तालुक्यातील धामणी गावच्या हद्दीत गाढी नदीच्या पुलाखाली 25 वयोगटातील एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर महिलेची ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपासला सुरुवात केली आहे तसेच मृत महिलेची (Woman) ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.  

या घटनेतील मृत महिलेचा मृतदेह बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पनवेल तालुक्यातील धामणी गावच्या हद्दीत गाढी नदीच्या पुलाखाली नदी पात्रात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून शव विच्छेदन केले असता सदर महिलेची तिच्याच ओढणीने गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा (Crime) गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.  

हेही वाचा - Investment Tips 2023: मंदीतही संधीची सुकर वाट... पाहा गुंतवणूकीचे 'हे' लाभदायक पर्याय

कोण आहे की महिला? 

या घटनेतील मृत महिला अंदाजे 25 वयोगटातील असून तिची उंची 150 से.मी. आहे. माध्यम बांधा असलेल्या सदर महिलेचा चेहरा काळवंडलेला असून तिच्या अंगावर हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस आहे. त्यामध्ये हिरव्या रंगाचा फुल बाह्यांचा कुर्ता असून त्यावर गुलाबी रंगाची फुलांची व सोनेरी रंगाच्या टिकल्यांची डिझाईन तसेच हिरव्या रंगाची सलवार आणि त्याच रंगाची ओढणी आहे. या महिलेच्या दोन्ही हातावर कोपरापर्यंत मेहंदी काढली असून तिच्या डाव्या हाताच्या दंडावर आय लव्ह मॉम डॅड असे गोंदलेले आहे. या वर्णनाच्या महिलेसंदर्भात कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.