ऑटो चालकाकडून सहकाऱ्यांच्या मदतीनं प्रवाशांची लुटमार

नागपुरात ऑटोचालकानं त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं प्रवाशांची लुटमार केल्याची धक्कादायक घटना

Updated: Jan 22, 2020, 09:48 PM IST
ऑटो चालकाकडून सहकाऱ्यांच्या मदतीनं प्रवाशांची लुटमार

नागपूर : नागपुरात ऑटोचालकानं त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं प्रवाशांची लुटमार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. राजकिशोरसिंग शिवनाथसिंग हे ऑटोनं एमआयडीसी भीमनगर इथून रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी निघाले होते. 

दरम्यान ऑटोत अजून तीन जणांना ऑटोचालकाने बसवलं. त्यानंतर ऑटोचालकानं रिक्षा फारशी वर्दळ नसलेल्या अजनी रेल्वे ट्रॅकजवळ नेली.

तिथे रिक्षा चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी राजकिशोरसिंग यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील पैसे लुटले. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तीन जणांना अटक केली आहे.