बदलापुरात तरूणाची भरदिवसा हत्या

बदलापूरात दिवसा ढवळ्या सचिन शिंदे या २६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली.

Updated: Jan 22, 2020, 09:11 PM IST
बदलापुरात तरूणाची भरदिवसा हत्या

बदलापूर : बदलापूरात दिवसा ढवळ्या सचिन शिंदे या २६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. सुरवळ चौकात त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. नामदेव कोइंडे या ६७ वर्षाच्या व्यक्तीने ही हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपी नामदेव कोइंडेला बदलापूर पूर्व पोलिसांनी अटक केली. प्रेम संबंधातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.