सातारा : फेसाळणारे आणि खाली कोसळणारे धबधबे तुम्ही अनेक पाहिले असतील मात्र उलटया दिशेने कोसळणारा धबधबा तुम्ही पाहिलाय का?. सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण केलेल्या सडावाघापूर पठारावर हा उलट्या दिशेने फवारे उडवणारा धबधबा अनुभवयाला मिळतो. पाटणपासून अवघ्या १२ किलो मीटरवर सडावाघापूर पठारावर हा धबधबा उलटया दिशेने वाहतो. प्रचंड हवेमुळे पठारावरुन वाहून जाणारे पाणी उलटया दिशेने जोरदार उडते आणि हा रिव्हर्स धबधबा तयार होतो. या रिव्हर्स धबधबा अनुभवण्यासाठी राज्यभरातिल पर्यटक गर्दी करीत आहेत.