Paytmमध्ये मोठे बदल, युजर्सना मिळणार नवीन UPI ID; असं करा अ‍ॅक्टिव्ह

Paytm UPI Change: पेटीएमवर आरबीआयने मोठी कारवाई केल्यानंतर आता पेटीएममध्ये आणखी एक बदलाव होणार आहे. काय असणार आहे हा बदल जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 18, 2024, 09:49 AM IST
Paytmमध्ये मोठे बदल, युजर्सना मिळणार नवीन UPI ID; असं करा अ‍ॅक्टिव्ह title=
Paytm begins user migration to new UPI IDs

Paytm UPI Change: Paytm गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच पेटीएम बँकवर बंदी घातली आहे. त्यानंतर आता आणखी एक मोठा बदल करण्यात येत आहे. लवकरच युजर्सना UPI ID बदलावा लागू शकतो. त्यासंबंधी हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या Paytm युजर्सचे UPI ID 987XXXXXXX@patm पासून सुरू होतो. मात्र लवकरच कंपनीकडून युजर्स नव्या UPI ID मध्ये मायग्रेट करण्याची सुविधा मिळणार आहे. युजर्स लवकरच पार्टनर बँकसोबत UPI ID बदलू शकणार आहे. 

पेटीएमची पेरेंट कंपनी One 97 Communications (OCL) ला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून अप्रुव्हल मिळाले आहे. ते आता त्यांच्या युजर्सना न्यू पार्टनर बँकसोबत मायग्रेट करु शकणार आहेत. त्यानंतरही ते पुढे आपली पेमेंट्स जारी ठेवू शकणार आहेत. NPCIने 14 मार्च 2024 ला OCLला थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडर (TRAP) म्हणून काम करण्यास मंजूरी दिली होती. त्यानंतर पेटीएमने अॅक्सिस बँक, HDFC बँक, एसबीआय बँक, यश बँकेसोबत पार्टनरशिप केली आहे. या बँका आता TRAP अतर्गंत पेटीएम युजर्सना सुविधा देणार आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, या बदलांमुळं सर्व पेटीएम युजर्सना लवकरच एक पॉपअप मिळणार आहे. या पॉपअपच्या माध्यमातून युजर्सना त्यांची परवानगी मागितली जाईल आणि त्यानंतर वर नमूद केलेल्या बँकांपैकी कोण्या एका बँकेच्या UPI हँडल जस की @ptsbi, @pthdfc, @ptaxis आणि @ptyes मधील एक पर्याय निवडावा लागणार आहे. 

त्यानंतर युजर्स Paytm वर पहिल्यासारखेच तुम्ही UPI सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. युजर्स आरामात पेमेंट रीसिव्ह आणि ट्रान्सफर करु शकणार आहेत. मात्र, सध्या QR Code मध्ये कोणता बदल होईल की नाही, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. 

आरबीआयची पेटीएम बँकेवर कारवाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई करत निर्बंध लावले होते. आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएम बँक २९ फेब्रुवारीपासून कोणत्याही खात्यात ठेवी स्वीकारू शकत नाही. रिझर्व्ह बँकेने ३१ जानेवारी रोजी याबाबत आदेश जारी केला होता.