रायगड : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता रायगड जिल्ह्यातील महाड शहरात 8 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी स्वत: हा लॉकडाऊन लागू केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा पहिल्यांदा जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्याच प्रमाणे हा लॉकडाऊन आहे.
लॉकडाऊन लागू करण्यासाठी काही राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येत हा लॉकडाऊन लागू केला आहे. जीवनावश्यक वस्तू सोडून इतर दुकानं बंद करण्याची ठेवण्याचं आवाहन करण्यात आला. त्याला सगळ्यांनी प्रतिसादही दिला.
डेअरी सकाळी 10 पर्यंत सुरु ठेवण्यात येणार असून त्यानंतर दुधाची विक्री होणार नाही. मेडिकल मात्र 24 तास सुरु राहतील. महाडमध्ये 68 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 7 लोकांचा मृत्यू झाला आहे.