बुलडाण्यात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

उच्च शिक्षित नवरा आणि सासू-सासऱ्यांकडून हुंड्यासाठी एका विवाहितेला तब्बल दीड महिना कोंडून ठेवल्याचं समोर आलंय. पीडित महिलेनं जिल्हा पोलिस अधीक्षकांना फोन केल्यानंतर पोलिसांनी दरवाजाचं कुलूप तोडतून तिची सुटका केली. 

Updated: Jun 10, 2017, 08:49 AM IST
बुलडाण्यात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ title=

बुलडाणा : उच्च शिक्षित नवरा आणि सासू-सासऱ्यांकडून हुंड्यासाठी एका विवाहितेला तब्बल दीड महिना कोंडून ठेवल्याचं समोर आलंय. पीडित महिलेनं जिल्हा पोलिस अधीक्षकांना फोन केल्यानंतर पोलिसांनी दरवाजाचं कुलूप तोडतून तिची सुटका केली. 

विशेष म्हणजे या महिलेला कोंडून ठेवण्यात आलं होतं तिथं 3 सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याचंही आढळून आलंय. या महिलेचा पती योगेश तायडे हा BAMS डॉक्टर असून सासरा सेवानिवृत्त शिक्षक आहे. पीडित महिलादेखील वैद्यकीय शिक्षण घेतेय. 

योगेशला स्वतःच्या रुग्णालयासाठी जमीन घ्यायची होती. त्यासाठी तो आपल्या सासऱ्यांकडे 5 लाख रुपये मागत होता. मात्र पैसे दिले नाहीत म्हणून या विवाहितेचा छळ केला जात होता.