Petrol Diesel Price : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा?

Petrol Diesel Price Today in Marathi: महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी येत आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 7 ते 8 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 106 रुपयांवरुन 98 ते 99 रुपये प्रति लिटरवर येण्याची शक्यता आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Dec 29, 2023, 10:23 AM IST
Petrol Diesel Price : महाराष्ट्रातील  पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा? title=

Petrol Diesel Price on  29th December 2023 : गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर दिर्घकाळापासून स्थिर आहेत. याचदरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर 8 ते 10 रुपयांनी कमी होऊ शकतात. याबाबत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याबाबत पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय चर्चा करत आहेत. याशिवाय तेल कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे. 

दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याबाबत अर्थ मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाला वेगवेगळे मसुदे पाठवले असल्याचे सूत्रांचे म्हणणे. याला फक्त पंतप्रधानांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीबाबत चर्चा होत असून ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति डॉलर 78.71 रुपये झाली आहे. देशांतर्गत किमतीही आंतरराष्ट्रीय किमतींवर अवलंबून असतात.

पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे दर

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या वेबसाइट iocl.com नुसार, दिल्ली ते कोलकाता पर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आज दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर आहे, तर कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर आहे.

महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

पुणे

पेट्रोल 105.79 रुपये आणि डिझेल 92.32 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल 105.79 रुपये आणि डिझेल 92.32 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 107.45 रुपये आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर

हे सुद्धा वाचा : फ्रिजला भिंतीपासून किती दूर ठेवावे? 'या' ट्रिक करा फॉलो, अर्धे येईल बिल

घरबसल्या जाणून घ्या नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे दरही घरबसल्या मिळू शकतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती ग्राहकांना फोनवर मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी RSP आणि सिटी कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा. BPCL ग्राहकाने RSP आणि शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. HPCL ग्राहकांना HPPprice आणि सिटी कोड 922201122 किंवा नंबरवर पाठवावा लागेल. ग्राहकांना एसएमएसद्वारे सर्व माहिती मिळेल.