पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन राग अनावर; पतीने डोक्यात फर्शी घालून केला खून

वारंवार होत असलेल्या या वादाचे रुपातंर हत्येत झाले

Updated: Aug 2, 2022, 07:50 PM IST
पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन राग अनावर; पतीने डोक्यात फर्शी घालून केला खून title=

कैलास पुरी, झी मीडीया, पिंपरी चिंचवड : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीच्या डोक्यात कड्डप्पा फर्शी घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पिपंरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) समोर आला आहे. वाकडमधल्या काळाखडक परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रमेश हनुमंत पुजारी (35, रा. रामसुपर मार्केट, काळाखडक, वाकड) याला पोलीसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीसमोर पतीने पत्नीची हत्या केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश पुजारी आणि त्याची पत्नी ललिता रमेश पुजारी वाकड मधील काळाखडक परिसरात वास्तव्यास होते. पती रमेश आणि त्याची पत्नी ललीता यांच्यात अनेकदा वाद होत होते. चारित्र्याच्या संशयावरून रमेश वारंवार भांडण करत त्याच्या पत्नीला मारहाण देखील करत होता. सोमवारी रात्री पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. यावेळी रागाच्याभरात रमेशने पत्नीच्या डोक्यात कड्डप्पा फरशी मारून तिचा खून केला. त्यानंतर आपल्या हातून खून झाल्याचे लक्षात येताच रमेशने तेथून पळ काढला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच आरोपी रमेश पुजारी याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.