पिंपरी चिंचवडमध्ये दोन मद्यधुंद तरुणींचा पोलीस स्थानकात राडा

Updated: Aug 30, 2018, 04:18 PM IST

पुणे : पोलीस आयुक्ताल्यातील चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये  दोन तरुणींनी मध्यरात्री मोठा गोंधळ घाटल्याचा एक व्हिडियो व्हायरल होतोय. पोलिसांसोबत अत्यंत असभ्य भाषेत  वाद घालणाऱ्या ह्या तरुणींचं नावं  स्मिता बाविस्कर आणि प्रिया पाटील असल्याच समजतयं.

उद्धट वर्तन 

 रात्री गस्तिवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी ह्या दोन तरुणी रसत्यात उभ्या असलेल्या या तरुणींकडे चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना उलट उत्तर दिली. तेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं मात्र तिथे आल्यानंतर या दोघींचा पारा अधिकच चढला. 

तपास सुरू  

तेव्हा पोलीस स्टेशन मधल्याच एका पोलीस कर्मचाऱ्याने व्हिडिओ काढल्याने हा प्रकार जगासमोर आला. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ACP सतीश पाटील चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले असुन ते या प्रकरणाची माहिती घेत आहेत.