PM Narendra Modi Solapur Rally : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजरे लावली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. इंडियाआघाडीत नेत्याच्या नावावर महायुद्ध सुरु आहे. आता मला सांगा ज्याचे नाव माहिती नाही, ज्याचे चेहरा माहिती नाही, त्याच्या हातात तुम्ही इतका मोठा देश देणार आहात का? असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.
माझ्या प्रिय सोलापूरकरांना अतिशय मनापासून नमस्कार करतो. जय जय रामकृष्ण हरी, सोलापूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेशवराच्या चरणी मी नतमस्तक होतो. मित्रांनो या सोलापुराचे प्रेम पाहून 2024 मध्ये मी दुसऱ्यांदा तुमच्याकडे आलो. जेव्हा मी जानेवारीत आलो होतो. तुमच्या हक्कांना पूर्ण करण्यासाठी आलो होतो. पण आज मी तुमच्याकडे काही मागण्यासाठी आलो आहे. मी तुमच्याकडे यासाठी मागतोय कारण मला तुम्हाला पुढे भरपूर काही द्यायचे आहे. मला धन, दौलत नको आहे. मला यश किर्ती नको आहे. मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. मी आज तुमचे आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. यंदाच्या निवडणुकीत तुम्ही पुढील 5 वर्षांसाठी विकासाच्या गॅरंटीला निवडणार आहात. दुसरीकडे ते लोक आहेत ज्यांनी 2014 च्या आधी देशाला भष्ट्राचार, आतंकवाद आणि कुशासनात लोटले होते. त्यांच्या या कलंकित इतिहासानंतरही काँग्रेस परत देशाची सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहत आहे. यांना अंदाज देखील नाही की पहिल्या दोन निवडणुकीत इंडिया आघाडीचा डब्बा गुल झाला आहे, असे मोदींनी म्हटले.
आता मी पुन्हा एकदा डोकं झुकवून तुमच्याकडे आलो आहे. गेल्या 10 वर्षांपासून तुम्ही मोदींच्या कामांना पाहिले आहे. त्यांच्या एक एक शब्द ऐकले आहेत. त्यामुळे तुम्ही मोदींना ओळखता. तर दुसरीकडे इंडिया आघाडीत नेत्याच्या नावावर महायुद्ध सुरु आहे. आता मला सांगा ज्याचे नाव माहिती नाही, ज्याचे चेहरा माहिती नाही, त्याच्या हातात तुम्ही इतका मोठा देश देणार आहात का? काँग्रेस सत्ता मिळवण्यासाठी देशाचे तुकडे आधीपासूनच करत आली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
आता त्यांनी एक नवीन फॉर्म्युला आणला आहे. पाच वर्षात पाच पंतप्रधान. एक वर्षात एक पंतप्रधान जेवंढ लुटायचं तेवंढ लुटणार, त्यानतंर दुसऱ्या वर्षात दुसरा पंतप्रधान लूट करणार... असे पाच वर्ष सुरुच राहणार आहे आणि इथे खोटी शिवसेनामधील लोक म्हणतात की त्यांच्या पक्षात पंतप्रधान पदासाठी खूप चेहरे आहेत. त्यांच्यातील एका नेत्याने आम्ही एका वर्षात चार पंतप्रधान बनवले तर काय जातंय? आता मला सांगा पाच वर्ष पाच पंतप्रधान अशा फॉर्म्युल्याने देश चालणार आहे का? आपण कधी त्या दिशेने जाऊ शकतो का? नाही ना. पण त्यांना देशात सत्तेत येण्यासाठी हाच एक पर्याय राहिला आहे. कारण त्यांना देश चालवायचा नाही. त्यांना तुमच्या भविष्याची चिंता नाही. त्यांना तर मलई खायची आहे.
हा आपला महाराष्ट्र सामाजिक न्यायची भूमी आहे. या भूमीने ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपाने असे महान व्यक्ती दिले आहेत, ज्यांनी समाजातील सर्वात कमजोर वर्गाला ताकद दिली. प्रेरणा दिली. तुम्ही काँग्रेसचे शासन पाहिले आहेत. त्यासोबतच तुम्ही मोदींच्या 10 वर्षांचा सेवाकालही बघितला आहे. गेल्या 10 वर्षात सामाजिक न्यायसाठी जितके काम झाले, तेवढे कार्य स्वातंत्र्यानंतर कधीच झालेले नाही, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
काँग्रेसने सत्तेत असताना SC, ST, OBC यांच्या प्रत्येक हक्काला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामागे त्यांची एक खेळी होती ती म्हणजे यांना असेच आपल्या आश्रिताप्रमाणे राहू द्या, जेणेकरुन त्यांच्याकडून आपल्याला मतदान मिळू शकेल. हे मुद्दाम त्यांनी केले. पण मोदी आणि तुमचे नाते हृदयातून जोडले आहे. गेल्या 10 वर्षात आम्ही सामाजिक न्यायावर काम केले आहे. मी आता गरीबांची सेवा करतोय, ते मी त्यांचे कर्ज फेडत आहे. मी गरीबांच्या खाल्लेल्या मिठाला जागतोय. मेडीकलमध्ये आरक्षण लागू केले. भाजपने SC, ST यांचे आरक्षण वाढवण्याची तरतूद असते. आम्ही ते आरक्षण वाढवले. आम्ही कोणाचाही हक्क काढून घेतला नाही, असे नरेंद्र मोदींनी म्हटले.
मी असे ठरवलंय की मला आता गरीबांच्या मुलांना डॉक्टर बनवायचं आहे. त्यांच्या मुलींनाही इंजिनीअर, डॉक्टर बनवायचं आहे. पण प्रत्येकाच्या नशिबात इंग्रजीत शिक्षण घेणे नसते. जर तो मराठी शाळेत शिकतोय तर त्याचा गुन्हा काय? तुम्हाला आता मराठी माध्यमातून डॉक्टर, इंजिनिअर बनता येऊ शकते. इंग्रजी आली नाही तरीही तुम्ही देश चालवू शकता. काँग्रेसला कधीच दलित, आदिवासी आणि ओबीसी यांनी नेत्यांनी देशाचे नेतृत्व करावे असे कधीही वाटत नव्हते. यांनी बाबासाहेब आंबडेकरांचा कायमच विरोध केला. पण संविधान बदलण्याचा हक्क कोणालाही नाही. ते कोणीही बदलू शकत नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सरकार तुमच्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. त्यामुळे येत्या 7 मे रोजी राम सातपुते यांना भरघोस मतदान करा. राम सातपुते हे सोलापूरचा नक्की विकास करतील, असे आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केले