पुण्याच्या महापौरांनाही 'तुकाराम मुंढें'सारखे अधिकारी 'नकोसे'

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शासनाच्या परत बोलावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Jun 29, 2017, 09:52 AM IST
पुण्याच्या महापौरांनाही 'तुकाराम मुंढें'सारखे अधिकारी 'नकोसे' title=

पुणे : पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शासनाच्या परत बोलावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेशी संबंधित महत्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी महापौर, पालिका आयुक्त आणि नगरसेवकांची बैठक होती, या बैठकीला मात्र आयुक्त तुकाराम मुंढे अनुपस्थित राहिल्याने, महापौर आणि नगरसेवकांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

आयुक्तांना बैठकीची कल्पना देण्यात आली होती, त्यांनी उपस्थित राहणार असल्याचंही सांगितलं होतं, असं महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितलं पण ते ऐन वेळेस आले नाहीत, त्यांनी इतर अधिकाऱ्यांना पाठवून दिलं, यामुळे निर्णय होवू शकले नाहीत.

तर दुसरीकडे तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महापालिकेप्रमाणे, पुण्यातही शिस्तीने प्रशासन चालवताना दिसत आहेत, यावरून देखील अशा प्रकारचे वाद वाढत असल्याचं म्हटलं जात आहे.