सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकजण व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2023 ) ची आतुरतने वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन डे दिवशी प्रपोज करुन अनेक जण आपल प्रेम व्यक्त करतात. मात्र, 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी एका तरुणीवा प्रपोज करणाऱ्या तरुणाची जेलमध्ये रवानगी झाली आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नांदेड शहरातील ही घटना आहे (Nanded Crime News).
व्हॅलेंटाईन डे साठी अल्पवयीन मुलीला प्रपोज करणे हा महाविद्यालयीन तरुणाला चांगलेच महागात पडले. तरुणावर विनयभंगासह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे. कॉलेज परिसरातूनच पोलिसांनी या प्रेमवीराला ताब्यात घेतले आहे.
वजिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील एका महाविद्यालयात पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा शिकतात. 'व्हॅलेंटाईन डे' निमित्ताने महाविद्यालयात आरोपी तरुणाने मुलीला जबरदस्ती प्रपोज केले.
उद्या व्हॅलेंटाईन डे आहे तू माझी गर्लफ्रेंड हो म्हणत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने तात्काळ 112 क्रमांकावर संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपी मुलाला ताब्यात घेतले. तक्रारदार मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे. तर, आरोपी 18 वर्ष वयावरील असल्याने त्याच्यावर विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे.
व्हेलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी एका तरुणाने चुकीचा मार्ग निवडला. वसईच्या माणिकपूर पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. याच्याकडून चोरलेल्या पाच मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तपासादरम्यान चोरी करण्यामागे याने सांगितलेले कारण ऐकून पोलिसही शॉक झाले आहेत. चोरलेल्या मोटारसायकलच्या मिळणाऱ्या पैशातून तो गर्लफ्रेंडला व्हलेनटाईन गिफ्ट देणारं होता अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. चंद्रेश पाठक असं यां आरोपीचे नाव आहे. चंद्रेश हा मुंबईच्या दहिसर परिसरात राहणारा आहे. वसईच्या नायगाव परिसरातून एक इलेक्ट्रिक मोटारसायकल चोरी झाली होती. या प्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.