अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने पोलीस निरीक्षकाचे घर, गाडी जाळली

अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने  पोलीस निरीक्षकाचे घर आणि कार पेटवले. 

Updated: Feb 12, 2020, 07:48 PM IST
अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने पोलीस निरीक्षकाचे घर, गाडी जाळली title=

कोल्हापूर : अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने भुदरगड तालुक्यातील पोलीस निरीक्षकाचे घर आणि कार पेटवले. पोलीसलाईनमधील अतिक्रमण काढल्याने पोलीस निरीक्षकाचे घर पेटवण्यात आल्याने पोलीस अधिकाऱ्याला धक्का बसला आहे. गारगोटीमधून पळून गेलेल्या सुभाष देसाई या आरोपीला महागावमधून अटक करण्यात आली आहे. 

सुभाष देसाई या आरोपीने पोलीसलाईनमधील अतिक्रमण काढल्याने पोलीस निरीक्षकांचे घर आणि गाडी रॉकेल टाकून पेटून दिली. यामध्ये पोलीस निरीक्षक संजय पतंगे याचे घर काही प्रमाणात पेटले असून दारासमोरील गाडी जळून खाक झाली आहे. 

पोलीस निरीक्षकाच घर आणि गाडी पेटवून देणाऱ्या आरोपीला महागावमधून अटक करण्यात आली आहे. सुभाष देसाई याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सुभाष देसाई याने पोलीस लाईनमध्ये अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण पोलिसांनी काढल्यानंतर चिडलेल्या सुभाष देसाई या आरोपीने पोलीस निरीक्षकांना टार्गेट केले आणि सुड उगविण्यासाठी त्याने घर आणि गाडी जाळली.