अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Mp Navneet Rana) यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात (Rajapeth Police Thane) 3 दिवसांपूर्वी राडा घातला होता. एका तरुणीला पळून नेल्याचा आरोप करत राजापेठ पोलीस ठाण्यात राडा केला होता. त्यांनी पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची केली. पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यामुळे आज एक पोलीस पत्नी वर्षा भोयर (Police Wife Varsha Bhoyar) यांनी राजापेठ पोलीस ठाण्यासमोर नवनीत राणा यांच्या विरोधात हातात पोस्टर घेऊन आंदोलन केलं. तसेच त्यांचा निषेध केला. (police wife varsha bhoyar agrresive and agiation against to amravati mp navneet rana due to her contriovesy with police officer and staff in rajapeth police chowcky)
वर्षा भोयर यांनी पोलिसांना निवेदन दिलं. खासदार राणा यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हे दाखल करावी, तसंच पोलिसांची माफी मागावी अशी मागणी वर्षा यांनी केली. तसेच खासदार राणा विरोधात गुन्हा दाखल न केल्यास, पोलीस ठाण्यातच आमरण उपोषणाचा इशारा दिलाय.
खासदार राणा यांनी पोलिसांसोबत विनाकारण हुज्जत घातल्याचा आरोप करत पोलीस बॉईज संघटना आणि वर्षा भोयर चांगल्याच आक्रमक झाल्यात. भोयर यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात राणा यांच्या विरोधात हातात फलक घेतलं. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. तसंच खासदार राणा यांच्या विरोधात 2 दिवसात गुन्हा दाखल केला नाही, तर पोलीस ठाण्यात आमरण उपोषणाचा करण्याचा इशारा दिलाय.
संबंधित युवतीने नवनीत राणा यांच्या विरोधात प्रतिक्रिया दिली. त्यानंतर माझी बदनामी थांबवा, अशी विनंती खासदार राणा यांना केली. त्यांनतर पोलीस पत्नी वर्षा भोयर चांगल्याच आक्रमक झाल्यात.
भोयर यांनी आज राजापेठ पोलीस ठाण्यात पुन्हा आंदोलन करून नवनीत राणा यांच्या विरोधात रान उठवलं. राणा यांच्यावर गुन्हे दाखल न झाल्यास देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता पोलीस पत्नी भोयर यांच्या मागणीकडे लक्ष दिलं जातं का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.