close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट, राष्ट्रवादीला खिंडार?

प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार ?

Updated: Jun 4, 2019, 03:02 PM IST
प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट, राष्ट्रवादीला खिंडार?

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : राज्यातील राष्ट्रवादीचे दहा आमदार आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, राज्यातील संपूर्ण काँग्रेस पक्षच आपल्या संपर्कात असल्याचा टोला यावेळी आंबेडकरांनी लगावला. संपर्कात असलेल्या आमदारांनी त्यांची व्यथा आपल्याकडे व्यक्त केल्याचं त्यांनी म्हंटल. काँग्रेससोबत आघाडी होणार की नाही याबाबत अद्याप काहीच सांगू शकत नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, आंबेडकरांनी विधानसभेसाठी यावेळी राजू शेट्टींना चुचकारण्याचा प्रयत्न केला. सध्या प्रमुख कार्यकर्त्यांची शेट्टींशी चर्चा सुरु केली आहे. पुढच्या काळात राजू शेट्टींनी कुणासोबत जावं ते लवकर ठरवावं असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.