close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

केंद्र आणि राज्य सरकार मिळुन मंदी लादतेय- प्रकाश आंबेडकर

 केंद्र आणि राज्य सरकार मिळुन मंदी लादत असल्याचा आरोप

Updated: Sep 16, 2019, 03:56 PM IST
केंद्र आणि राज्य सरकार मिळुन मंदी लादतेय- प्रकाश आंबेडकर

लातूर : मंदी ही अशांततेची सुरुवात असून ही अशांतता देशातील भाजप सरकार आणत असल्याचा आरोप वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लातूरमध्ये केलाय. प्रकाश आंबेडकर हे राज्यभर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सत्ता संपादन महारॅलीत बोलत होते. देशात ४० ते ४५ टक्के जनता ही गरीब असताना वंचित घटक हा अधिक वंचित राहावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळुन मंदी लादत असल्याचा आरोपही यावेळी आंबेडकर यांनी केला.

हुकूमशाही सरकार 

आताची मंदी ही नोट बंदी सारखी असून त्यावेळेही नोटाबंदीची गरज नसताना सरकारने ती लादली. आता सरकार देशातील विरोधी पक्ष संपवून हुकूमशाही सारखे वागत असल्याचे प्रतिपादनही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. लातूरच्या टाऊन हॉल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर आयोजित भव्य सभेत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सरकार उलथवून लावण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुस्लिम उमेदवार रिंगणात

वंचित बहुजन आघाडीतून एमआयएमने बाहेर पडायचा निर्णय घेतला असला तरी फारसा फरक पडणार नसून वंचित २५ मुस्लिम उमेदवार निवडणुकीत उतरवले अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती येथे दिली. दर्यापूर येथे अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी वर्षा निमित्ताने मातंग समाज सत्ता संपादन व समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीत आम्हाला मुस्लिम समाजाची मते मिळाली नाही. मात्र काही प्रमाणात मुस्लिम समाज आमच्या पाठीशी असून या विधानसभा निवडणुकीत वंचितला मुस्लिमांची देखील मतं मिळतील असे प्रकाश आंबेडकर यांनी बोलतांना सांगितले.