देहू, पुणे : PM Modi to Visit Maharashtra : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे 11 हजार कोटी रुपये त्यावर खर्च होणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू येथे केली.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीक्षेत्र देहू येथे आले. यावेळी ते बोलत होते. मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. आषाढी वारीसाठी सोमवारी तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा झाल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी वारकऱ्यांनी संत तुकराम महाराजांचा नामघोष केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची सुरुवात प्रार्थनेने झाली. आमचे जीवन संतांची कृपा आहे. संतांची कृपा लाभली तर ईश्वराची कृपा लाभते. त्याची अनुभूती देहूमध्ये घेत आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे 11 हजार कोटी रुपये त्यावर खर्च होणार आहे, अशी माहिती मोदी यांनी यावेळी दिली.
Maharashtra | Prime Minister Narendra Modi offered prayers to Sant Tukaram Maharaj at Sant Tukaram temple in Pune and inaugurated a shila temple here. pic.twitter.com/N5HZCTfMa0
— ANI (@ANI) June 14, 2022
देहूतील शिळा मंदिर ज्ञान आणि भक्तीचे आधार शिळा मंदिर आहे. देहूगावची महती मोठी आहे. संत तुकाराम यांचे अभंग आम्हाला आजही मार्गदर्शक ठरतात. जो भंग होत नाही तो अभंग, असे मोदी म्हणाले.