मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसला लागली आग. विरारहून देवगडला जाणाऱ्या बसला अचानक आग लागली. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे ही घटना घडली. स्थानिकांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आगीत बसचं पूर्ण नुकसान झालं आहे पण कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
बसमधून प्रवास करत होते 25 प्रवाशी. या सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. मुंबई - गोवा हायवेवर खासगी प्रवासी बसला आग लागल्याची घटना सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली आहे.
BREAKING NEWS : गोवा महामार्गावर खासगी बसला आग
विरारहून देवगडला जाणारी बसला लागली
कोणतीही जीवितहानी नाही https://t.co/HOK58cBO5u@ashish_jadhao @DakshataThasale pic.twitter.com/y1SVDgt57n— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 10, 2020
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे पारेख पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली आहे. विरारहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे ही बस जात होती. यावेळी बसमध्ये 25 प्रवाशी प्रवास करत होते. दरम्यान, आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशी सुखरूर बसमधून उतरले. यावेळी स्थानिकांच्या मदतीनं बसला लागलेली आग विझवण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. प्रवास करण्याकरता अनेक अटी पाळाव्या लागतात. अशावेळी अपघात झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.