पुण्यातील कचरा प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी सांगितला उपाय

विकेंद्रित कचरा विल्हेवाट हाच पुण्यातील कचरा प्रश्नावर उपाय

Updated: Nov 2, 2020, 02:30 PM IST
पुण्यातील कचरा प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी सांगितला उपाय  title=

पुणे : विकेंद्रित कचरा विल्हेवाट हाच पुण्यातील कचरा प्रश्नावर उपाय असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष तसेच कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. पुण्याच्या आंबेगाव मध्ये कचरा प्रकल्प प्रक्रिया नागरिकांनी पेटवल्याची घटना रविवारी घडली. त्या पार्श्वभूमीवर वॉर्डातील कचरा वॉर्डातच जीरवण्याचे प्रयत्न गरजेचं असल्याचं पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे महापालिकेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची शहरातील कचरा प्रश्ना सह विविध प्रश्नांवर बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारा त्यांनी भाष्य केले. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आत पगार दिलाच पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. आमचं सरकार जाण्याआधी ५०० कोटोंची मदत दिली होती. कर्ज काढावे लागेल म्हणत असतील तर एसटी स्टँड तारण ठेवावी लागतील असे ते म्हणाले. 

महाराष्ट्र, कर्नाटक सीमा प्रश्न ९ न्यायाधीशांच्या घटनापिठाकडे प्रलंबित आहे. सीमाभागातील ८५० गावं महाराष्ट्रात आली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे पाटील म्हणाले. हा प्रश्न राज्य सरकार, केंद्राकडे राहिला नाही तर सर्वोच्च न्यायालयात असून निकाल लागेपर्यंत मराठी भाषिक लोकांना जाच कमी होईल हे बघितलं पाहिजे असे ते यावेळी म्हणाले. 

मराठा आरक्षण असो किंवा इतर विषय हे सरकार अभ्यास करत नाही, सल्ला घेत नाही असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला. हम करेसो कायदा सारखं वागतेय. मुख्यमंत्री मातोश्री बाहेर पडायला तयार नाहीत असेही ते म्हणाले. 

राज्यपाल नियुक्त १२ आमदार प्रश्नावर यावेळी त्यांनी बोलणं टाळलं. राज्यपाल पदाचा मान राखतो म्हणून या विषयावर बोलणार नसल्याचे ते म्हणाले. 

राज्य आणि केंद्रात काही संघर्ष आहे असं म्हणता येणार नाही. नियमानुसार निर्णय घेतले जात आहेत असून जसे महिलांसाठी सेवा सुरू केली तसेच इतर सेवा सुरू होतील असे म्हणत त्यांनी मुंबईकरांना आश्वस्त केले. विद्यार्थी फी या मुद्द्यावर उदयनराजे आणि संभाजीराजे बोलताना दिसत नाहीत. या बाबत छेडलं असता दोन राजे खासदार असलेल्या पक्षाचा मी अध्यक्ष आहे. मी बोललो म्हणजे सगळे खासदार,आमदार बोलले असे उत्तर देत त्यांनी प्रष्न टोलावला.