पुण्यात पतीने पत्नीवर संशय घेत बेडरुममध्ये कॅमेरा लावला... पण यानंतर ५ जणांवर गुन्हा दाखल

कॅमेराने जे टिपलं आणि त्यानंतर जे आरोप प्रत्यारोप झाले ते असे आहेत. पतीला शंका होती, म्हणून त्याने कॅमेरा लावला, पण कॅमेरात

Updated: Oct 4, 2021, 09:27 PM IST
 पुण्यात पतीने पत्नीवर संशय घेत बेडरुममध्ये कॅमेरा लावला... पण यानंतर ५ जणांवर गुन्हा दाखल title=

पुणे :  ही घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडची आहे. नवरा कामानिमित्ताने काही दिवस बाहेर गावी जात असे. पण यासोबत त्याला दिवसेंदिवस त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावरही संशय होता. नवऱ्याला ही बाब स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून त्याने तंत्रज्ञानाची मदत घेतली. बाहेर गावीजाताना त्याने त्याच्या बेडरुममध्ये कुणालाही न समजू देता एक छुपा कॅमेरा लावला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाजारात असे कॅमेरे उपलब्ध आहेत. 

अनेक वेळा पतीला असा संशय असतो की, बाहेरील व्यक्ती घरात येत असावी, किंवा अशा प्रकारच्या घटनांमध्ये व्यक्ती ही बाहेरची असते. पण या घटनेत असं काहीही झालं नाही. त्या छुप्या कॅमेऱ्याने जे काही त्या व्यक्तीच्या बेडरुममध्ये टिपलं, ते बाहेर सांगण्यासारखं देखील नव्हतं. 

पण या एका घटनेने त्या घरातील वातावरणच बदलून गेलं. एकाच नात्यातील ५ लोकांना आरोपी व्हावं लागलं. कारण या प्रकरणात पतीवर देखील बेडरुमध्ये कॅमेरा लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कॅमेराने जे टिपलं आणि त्यानंतर जे आरोप प्रत्यारोप झाले ते असे आहेत. पतीला शंका होती, म्हणून त्याने कॅमेरा लावला, पण कॅमेरात घराबाहेरील कोणतीही व्यक्ती दिसली नाही, तर धक्कादायक बाब म्हणजे ती व्यक्ती घरातीलच होती. 

यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तो असा आहे, पीडित महिलेवर नणंदेच्या पतीने बळजबरी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच पती हा कामानिमित्ताने बाहेरगावी असतो, तेव्हा नणंदेच्या पतीने याचा गैरफायदा घेतला आणि नणंदेच्या पतीने महिलेवर बळजबरी करुन बलात्कार केल्याचा आरोप पीडिताने केला आहे.

चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे, तर नणंदेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. सासरच्या व्यक्तींनी फ्लॅट घेण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली. 

यासाठी महिलेला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. तसेच बलात्काराच्या तक्रारीनंतर पती आणि नणंदेच्या पतीने महिलेचा गर्भपात केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

कॅमेरा लावल्यानंतर एकाच कुटुंबातील नात्यातील ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे, आरोपीत कॅमेरा ज्याने लावला त्या पतीचाही समावेश आहे.