Pune crime : कंडोममुळे आरोपीचं पितळ उघडं, जाणून घ्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण

पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरात ही घटना घडली आहे.

Updated: Nov 4, 2021, 04:27 PM IST
Pune crime : कंडोममुळे आरोपीचं पितळ उघडं, जाणून घ्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण title=

पुणे : महाराष्ट्रातील पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, येथे एका व्यक्तीची हत्या झाल. आरोपींचा शोध घेत असताना निगडी पोलिसांच्या हाती वापरलेले कंडोम सापडले, ज्यामुळे त्यांना आरोपीसंदर्भात माहिती मिळाली आणि त्यांनी आरोपींना अटक देखील केलं आहे. या आरोपीनी आपला गुन्हा मान्य केला आहे, ज्यानंतर आता त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासणी सुरू करण्यात येत आहे. अटक केलेल व्यक्ती हे तृतीयपंथी असल्याचे समोर आले आहे.

पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरात ही घटना घडली आहे. या भागातील काळभोर नगरमधील प्रमियम कंपनीच्या जवळील भागात ही घटना घडली आहे, ज्याची नोंद निगडी पोलिस स्टेशन अंतर्गत नोंदवण्यात आली आहे.

ही घटना 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आली आहे. बसराज भिमप्पा असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळभोर येथील मोकळ्या भागात हा व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना मिळाला. त्यानंतर त्याला जवळील रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले की, या व्यक्तीच्या मानेवरती गळा आवळल्याचे व्रण आहे. ज्यामुळे कोणी तरी हत्येचा कट केला असल्याची पोलिसांनी नोंद करुन त्या दिशेने शोध घेण्यास सुरुवात केली.

घटनास्थळी पोलिसांना दोन वापरलेले कंडोम मिळाले, ज्यानंतर त्यांनी त्या दिशेन शोध घेतला असता त्यांना आरोपींबद्दल कळाले.

या भागात देहविक्रिचा व्यापार सुरू असल्याचे पोलिसांना कळाले, रात्रीच्यावेळी त्याभागात दोन तृतीयपंथी थांबत असल्याची माहिती पोलिसांना लागली. ज्यानंतर पोलिसांना ते वापरलेले कंडोम आणि या तृथीयपंथ्यांची चाचणी केली असता, सगळा प्रकार उघडा झाला, ज्यानंतर या दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबुल केला.

त्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांनी मयत व्यक्तीकडे पैसे मागितले, परंतु त्यांनी देण्यासाठी नकार दिला ज्यानंतर या दोन्ही आरोपींनी मयत व्यक्तीचा गळा आवळला आणि त्याच्या खिशातून 4 हजार रुपये चोरले. त्यामुळे चोरीच्या हेतुने ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडून आणखी तपास सुरू आहे.