पुण्यात नक्की काय चाललंय ! स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार, बनावट ग्राहक पाठवला आणि पुढे जे दिसलं ते...

pimpri chinchwad spa center sex racket : पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड हद्दीत स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सर्व गोष्टींची शहानिशा केल्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकला. या स्पा सेंटरमधून दोघांना ताब्यात घेतले तर दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली.

Updated: Jun 18, 2023, 01:10 PM IST
पुण्यात नक्की काय चाललंय ! स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार, बनावट ग्राहक पाठवला आणि पुढे जे दिसलं ते... title=
Pune crime news : Spa Center Sex Racket burst at Pimpri Chinchwad

pimpri chinchwad spa center sex racket burst : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार सुरु असल्याची घटना उघडकीस आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापेमारी करत दलालाशिवाय अन्य एका महिलेला ताब्यात घेतले. तसेच दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात वेश्या व्यवसायाचे प्रमाण वाढू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड हद्दीत स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पिंपरी चिंचवड परिसरात वेश्या व्यवसाय वाढत असल्याची बात पोलिसांच्या लक्षात आली. स्पा सेंटरच्या नावाखाली चक्क वेश्या व्यवसाय सुरु होता. यावेळी पोलिसांनी बनावट ग्राहक स्पा सेंटरमध्ये पाठवला आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला.

पोलिसांनी यावेळी दलाल रोहन विलास समुद्रे आणि अन्य एक महिला अशी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात अन्य काही सुरु असलेल्या अवैध स्पा सेंटरचे धाबे दणाणलेत. पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी परिसरात असलेल्या अॅपल स्पा सेंटरमध्ये अवैध पद्धतीने सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा मारला. त्याआधी पोलीस कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून अॅपल स्पा सेंटरमध्ये प्रवेश केला. यावेळी अनैतिक प्रकार सुरु असल्याची बाब समोर आली. त्यानंतर पोलिसांनी सर्व गोष्टींची शहानिशा केल्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकला. या स्पा सेंटरमधून दोघांना ताब्यात घेतले तर दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली.

वाकड पोलिसांत दोघांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3,4,5 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील अॅपल स्पा सेंटरमध्ये अवैध सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी तस्करी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. 

बनावट विवाह नोंदणी पत्र 

दुसऱ्या एका घटनेत तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीचे थेट बनावट विवाह नोंदणी  पत्र तयार केल्याचा प्रकार घडला आहे. इतकंच, नव्हे तर बनावट विवाह नोंदणी पत्राच्या सहाय्याने सदर पीडित तरुणीला ब्लॅकमेल केल्याचंही उघड झालं आहे. सांगलीच्या (Sangali) वाळवा येथे ही धक्कादायक घटना घडली. पीडित तरुणीने तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तरुणीमागे लग्नाचा तगादा लावला होता. तिने नकार देताच त्याने बनावट विवाह नोंदणी पत्र तयार केले व त्याआधारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. सदर तरुणीही महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. एकतर्फी प्रेमातून त्रास देऊन बदनाम केल्याचे तिने आरोपात म्हटलंय.