कोरोनाची लस तयार करणाऱ्या सीरम संस्थेत अग्नितांडव

पुण्याच्या सीरम संस्थेत अग्नितांडव 

Updated: Jan 21, 2021, 03:07 PM IST
कोरोनाची लस तयार करणाऱ्या सीरम संस्थेत अग्नितांडव

पुणे : कोरोनाची लस तयार करून देशाला नवसंजीवनी देणारी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये मोठी दुर्घटना समोर आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये मोठी आग लागली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे. या आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे.  

सीरमच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली असून ती पसरू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 

पुण्यातील सीरमने तयार केली कोरोनावर लस 

कोरोनाची लस तयार करण्यात सीरम संस्थेचा मोठा वाटा आता. कोव्हिशील्ड लस ही सीरममध्ये तयार करण्यात आली आहे. देशातील अनेक भागांमध्ये सध्या कोव्हिशील्ड लसीच्या पहिल्या टप्प्यातील लसीकरण सुरू आहे.