अजितदादांच्या कार्यक्रमाला गर्दी, प्रशांत जगताप यांच्यासह 150 ते 200 पदाधिकाऱ्यांना अटक

राष्ट्रवादी (NCP) पक्ष कार्यालय उद्घाटनाला गर्दी करणे चांगलेच भोवले.  

Updated: Jun 21, 2021, 04:24 PM IST
अजितदादांच्या कार्यक्रमाला गर्दी, प्रशांत जगताप यांच्यासह 150 ते 200 पदाधिकाऱ्यांना अटक title=

पुणे : राष्ट्रवादी (NCP) पक्ष कार्यालय उद्घाटनाला गर्दी करणे चांगलेच भोवले. पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्यासह 150 ते 200 पदाधिका आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी गर्दी जमविल्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार  150 ते 200 राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.

दमरम्यान, आज अखेर पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 150 ते 200 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी टेबल जामीन मंजूर करत त्यांची सुटका केली. त्यानंतरच्या काळात नियमांची पायमल्ली करणार नाही सर्व नियम पाळून आणि गर्दी जमवली याप्रकरणी आम्ही पुणे शहराची दिलगिरी व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. याप्रकरणी अजित पवारांनी पक्षाच्या कार्यालयाच्या उदघाटनाप्रसंगी गर्दी जमविल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.

अजित पवार यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, कोरोना गेला का...

यावेळी प्रशांत जगताप म्हणाले, पक्षाच्या कार्यालयाचे अजितदादांच्या हस्ते संपन्न झाले होते. साध्या पद्धतीने उद्घाटन करण्याचे नियोजन होते. मात्र, दादांवरील प्रेम आणि राष्ट्रवादीवरील प्रेम बघून गर्दी झाली. गर्दी जमवण्याचा हेतू नव्हता, पण दादांनी कारवाईचे आदेश दिले होते. पोलिसांनी आमच्या सर्वांवर गुन्हा दाखल केला आणि कोविड नियमानुसार कारवाई केली आहे.

कोविड नियमांची पायमल्ली केली, त्याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. इतर पक्षांनी पण नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यानुसार कारवाई करावी, असे सांगत यापुढे आम्ही सर्व नियमाचे पालन करू, असे प्रशांत जगताप म्हणाले.