पुणे : पुण्यात एका आयटी इंजीनिअरने आत्महत्या केली आहे, एका हॉटेलवरून उडी मारून, या आयटी इंजीनिअरने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे, गोपीकृष्ण दूर्गाप्रसाद असं या युवा इंजीनिअरचं नाव आहे.
२५ वर्ष वयाच्या या युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी इंग्रजीत चिठ्ठी लिहिली आहे.आयटी क्षेत्रात नोकरीच्या अनिश्चिततेमुळे आपण आत्महत्या केली आहे, तसेच आपल्याला आपल्या परिवाराची चिंता वाटत असल्याचंही या इंजीनिअरने चिठ्ठीत म्हटलं आहे.
गोपीकृष्ण दूर्गाप्रसाद हा मूळचा आंध्रप्रदेशचा आहे. गोपीकृष्णने २-४ दिवसापूर्वी नोकरीवर रूजू झाला होता, दूर्गाप्रसादला कोणतंही वाईट व्यसन नव्हतं असं त्याच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे, या विषयी विमानतळ पोलिस अधिक तपात करीत आहेत.