पुणे : शहरातील ऐतिहासिक शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रम घेण्यास महापालिकेकडून मनाई करण्यात आलीय. या परिसरात होणारी गर्दी तसेच वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचं एका निवेदनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलंय.
३१ डिसेंबर रोजी याच शनिवार वाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषद झाली होती. तिला काही संघटनांनी विरोध केला होता. महापालिकेच्या या निर्णयामागे तसे काही कारण आहे का याविषयी आता चर्चा सुरु झालीय.
यापुढील काळात शनिवाड्यासमोरील व्यासपीठ तसेच पटांगणाचा वापर फक्त महापालिका तसेच शासकीय कार्यक्रमांसाठीच करण्यात येणार आहे.