पुण्यात एका दिवसात कोरोनाचे हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले, १६ जणांचा मृत्यू

पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. 

Updated: Jul 9, 2020, 10:40 PM IST
पुण्यात एका दिवसात कोरोनाचे हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले, १६ जणांचा मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. पुण्यात दिवसभरात कोरोनाचे १००६ रुग्ण आढळले आहेत. यामुळे पुण्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २५,१७४ एवढी झाली आहे. पुण्यात एका दिवसात १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ५८१ जणांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पुण्यामध्ये ४०२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामधले ७५ रुग्ण हे व्हॅन्टिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात सध्या ८,८०९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत १५,५७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ७८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात आज ३,९२९ स्वॅब तपासण्या आणि अँटिजेन किटद्वारे ७५५ तपासण्या करण्यात आल्या. 

दुसरीकडे राज्यात दिवसभरात ६,७९५ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३० हजार ५९९ एवढी झाली आहे. तर राज्यात एका दिवसात २१९ मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत १ लाख २७ हजार २५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ९,६६७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.