राज्यात आता पुणे पालिका 'या' 23 गावांच्या समावेशामुळे सर्वात मोठी महापालिका

राज्यात सर्वात मोठी महापालिका म्हणून पुण्याचा समावेश झाला आहे. पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) नव्याने 23 गावांचा समावेश केल्यानंतर राज्यातील सर्वात मोठी पालिका झाली आहे.  

Updated: Jul 1, 2021, 01:11 PM IST
राज्यात आता पुणे पालिका 'या' 23 गावांच्या समावेशामुळे सर्वात मोठी महापालिका title=
सौजन्य : Google Map & Ajit Pawar twitter

मुंबई / पुणे : राज्यात सर्वात मोठी महापालिका म्हणून पुण्याचा समावेश झाला आहे. पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) नव्याने 23 गावांचा समावेश केल्यानंतर राज्यातील सर्वात मोठी पालिका झाली आहे. (largest municipal corporation) पुणे महापालिकेच्या हद्दीलगतच्या 23 गावांचा महापालिकेत समावेश करण्यासाठी मागील वर्षांपासून हालचाली सुरु होत्या. त्याला आता मुहूर्तमेढ मिळाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुणे महापालिकेचा विस्तार झाला आहे. (Pune Municipal Corporation is now the largest municipal corporation in the Maharashtra due to the inclusion of 23 villages)

दरम्यान, पुणे महापालिकेच्या हद्दीलगतची 34 गावे महापालिकेत समावेश घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. त्यावर कार्यवाही करताना पहिल्या टप्प्यांत 11 गावांचा समावेश झाला. मात्र, उर्वरित गावेही टप्प्याटप्प्याने महापालिकेत घेण्यात येतील, असे शपथपत्र युती सरकारच्या काळात न्यायालयात सादर केले होते.

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघडीचे सरकार आले. त्यानंतर पुण्याचे पालकमंत्रीपदी म्हणून अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली. अजित पवार यांनी  पुढाकार घेत पुणे पालिकेच्या हद्दीत 23 गावे घेण्याचा निर्णय झाला. पुणे महापालिकेच्या हद्दवाढीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. महापालिका क्षेत्राला लागून असलेल्या 23 गावांचा महापालिकेत समावेश करण्याची अधिसूचना राज्य सरकारने जाहीर केली आहे. त्यामुळे आता ही गावे पुणे महापालिकेत समाविष्ट होणार आहेत.

तर दुसरीकडे आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या निर्णयबाबत समाधान व्यक्त करताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. आता अर्थसहाय्यही द्यावे. पुणे महापालिका राज्यातील सर्वात मोठी हद्द असणारी महापालिका झाली असताना या गावांचा सर्वांगीण आणि समतोल विकास करणे, याला आमचे प्राधान्य असेल, असे ते म्हणाले. 

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेली गावे :
 
1. बावधन बुद्रुक

2. किरकिटवाडी

3. पिसोळी

4. कोंढवे – धावडे

5. कोपरे

6. नांदेड

7. खडकवासला

8. मांजरी बुद्रुक

9. नऱ्हे

10. होळकरवाडी

11. औताडे-हांडेवाडी

12. वडाची वाडी

13. शेवाळेवाडी

14. नांदोशी

15. सणसनगर

16. मांगडेवाडी

17. भिलारेवाडी

18. गुजर निंबाळकरवाडी

19. जांभुळवाडी

20. कोलेवाडी

21. वाघोली

22. म्हाळुंगे

23. सूस