Pune news : मोहसिन शेख हत्या प्रकरणात हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाईंची निर्दोष मुक्तता

Dhananjay Desai: सन 2014 मध्ये आयटी इंजिनिअर असलेल्या मोहसिन शेखची निर्घृण हत्या (Mohasin Shaikh Murder Case) करण्यात आली होती. या हत्येनंतर धनंजय देसाई (Dhananjay Desai Arrested) यांना अटक करण्यात आली होती. जामिनावर बाहेर असलेल्या धनंजय देसाई यांची आता कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे

Updated: Jan 27, 2023, 04:43 PM IST
Pune news : मोहसिन शेख हत्या प्रकरणात हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाईंची निर्दोष मुक्तता title=

Pune News : पुण्यातील (Pune Crime) मोहसिन शेख हत्या प्रकरणातील (Mohsin Sheikh murder case) आरोपी आणि हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई (Dhananjay Desai) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयने (Pune news) धनंजय देसाई यांची निर्दोष मुक्तता केली आहे. 2014 मध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात तणाव निर्माण झाला होता. यावेळी आयटी क्षेत्रातील अभियंता असलेला मोहसिन शेख या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप धनंजय देसाई यांच्यावर करण्यात आला होता. मात्र आता त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

2019 मध्ये पुण्यातील हडपसर भागात झालेल्या मोहसिन शेख खून प्रकरणात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यापासून हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई तुरुंगाबाहेर होते. त्यानंतर आता या प्रकरणातून त्यांची न्यायालयाने सुटका केली आहे. फेसबुकवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकल्यानंतर हडपसरमधील बनकर वस्तीमध्ये काही तरुणांनी मोहसीन सादीक शेख (वय 28, रा. बनकर कॉलनी, हडपसर, मूळ- सोलापूर) या तरुणाचा खून केला होता. या खुनाच्या गुन्ह्यात देसाईंचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

आरोप काय?

19 जानेवारी 2014 रोजी मांजरी बुद्रुक येथे धनंजय देसाई यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. त्या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तसचे धार्मिक तेढ निर्माण करणारी पत्रके देखील वाटली होती. मोहसीनच्या खुनातील आरोपींनी धनंजय देसाई यांनी केलेल्या भाषणांपासून प्रेरित होऊन हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाईसह यांच्यासह २३ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते

कशी झाली हत्या?

छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर टाकल्यामुळे 2 जून 2014 मध्ये हडपसर मध्ये दंगल उसळली होती. त्यावेळी हिंदू राष्ट्र सेनेने तोडफोड केली होती. याच दरम्यान मोहसिनला त्याची दाढी आणि पेहरावावरुन  हटकण्यात आले होते. यानंतर मोहसिन बेदम मारहाण करण्यात आली होती ज्यात त्याचा मृत्यू झाला होता.