Pune Water Supply News : राज्यात उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत असतानाच आता पुणे शहरात एका नव्या संकटानं डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. पुणेकरांना आता उकाड्याच्या या दिवसांमध्ये पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. गुरुवारी पुण्यातील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, ज्यामुळं नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.
प्राथमिक माहितीनुसार पुण्यातील मध्यवर्ती पेठांचा भाग वगळता उपनगरांसह उर्वरित शहरात गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाहीये. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचं महापालिकेकडून कळवण्यात आलं आहे. पाणीपुरवठा केंद्रात देखभाल आणि तांत्रिक कामं पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. पाणीपुरवठा बंद असलेल्या सर्व भागांमध्ये शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा पुन्हा सुरु होईल. असं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पुण्यात आलं आहे.
पुणे शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदाच्या वर्षी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाणी काटकसरीनं न वापरण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला दिल्या आहेत. शहरात सध्याच्या घडीला उपलब्ध असणाऱ्या पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.
पाषाण, बावधन, सुस रोड, सुतारवाडी, वारजे माळवाडी, काकडे सिटी परिसर, महात्मा सोसायटी, बाणेर, बालेवाडी, करवेंगार, वारजे, कात्रज, कोंढवा, खादी मशीन चौक, लोहगाव, विमाननगर, विश्रांतवाडी, येरवडा, धानोरी, खराडी, रामटेकडी, सोलापूर रोड, कोरेगाव पार्क, फुरसुंगी हनुमान नगर, केळेवाडी, आयडीयल कॉलनी, सेनापती बापट रस्ता, जनवाडी, वैदूवाडी, भोसलेनगर, खैरेवाडी, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, हनुमाननगर, जनवाडी, संगमवाडी, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे, रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, गोकुळनगर पठार, बालाजीनगर, दत्तनगर, टेल्को कॉलनी परिसर, संतोषनगगर, दत्तनगर, आंबेगाव रस्ता, सुखसागरनगर, धनकवडी, आंबेगाव पठार, संतोषनगर, जांभूळवाडी रस्ता, धनकवडी गावठाण परिसरा, तळजाई परिसर, सहकारनगर भाग १ आणि २, कात्रज गाव इत्यादी भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.