Pune Water Cut : पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पुढील काही दिवस पाणी जपून वापरा. कारण येत्या गुरुवारी (22 ऑगस्ट) संपूर्ण शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. एवढंच नाही तर शुक्रवारी (23 ऑगस्ट) ला शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. (Pune News Pune Water Cut Thursday August 22 Water supply shutdown)
गुरुवारी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पुणेकरांनी बुधवारी पाण्याचा आवश्यक पुरवठा करुन ठेवण्याचं आवाहन पुणेकरांना करण्यात आलंय. या काळात कमीत कमी पाणी वापरण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आलाय. गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्याने आणि शुक्रवारी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याने सहकार्य करावे असं आवाहन महापालिकेने केलंय.
खडकवासला जॅक्वेल (नवीन), नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र, जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचआयएलआयआर टाकी परिसर आणि पर्वती टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईट, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी., एच.एल. आर. आणि चतुर्भुगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परिसरातील विद्युत तसंच पंपींग विषयक देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाणी पुरवठा खंडीत राहणार असल्याने शहरातील गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती LLR परिसर, सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसरातील पाणीपुरवठाही बंद राहणार आहे. तसंच कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, खैरेवाडी, शिवाजी ही. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैद्वाडी, वडाग्वाडी, पोलीस लाईन, संगमवाडी या भागासह संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.