'ते लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले...', पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठराखण केलीय. 

नेहा चौधरी | Updated: Jun 1, 2024, 11:23 AM IST
'ते लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले...', पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण title=
Pune Porsche Accident Ajit Pawar support Sunil Tingre

Ajit Pawar on Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून अल्पवयीन मुलाच्या वडील, आजोबानंतर आता आईलाही पोलिसांनी अटक केलीय. तर दुसरीकडे घटनेनंतर पोलीस ठाण्यात गेले आमदार सुनील टिंगरे यांच्यावर पोलिसांवर दाबव टाकण्याचा आरोप होतोय. घटना झाल्यापासून पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत? असा प्रश्न विचारण्यात येत होता. आज अखरे पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

अजित पवारांनी या टीकेला सडेतोड उत्तर देत 'कॅमेरासमोर येत नाही म्हणजे लपवाछपवी नाही', असे पत्रकारांना ठणकावून सांगितलं. एवढंच नाही तर सुनील टिंगरेंवरील आरोप हे बिनबुडाचे आहेत, असे म्हणत टिंगरेंची भक्कमपणे पाठराखण अजित पवार यांनी केली. 

नेमकं काय म्हणालेत अजित पवार?

पुणे कार अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची (Sunil Tingre) पाठराखण केलीय. 'सुनील टिंगरेंवरील आरोप बिनबुडाचे असून, टिंगरे लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले होते. सुनील टिंगरेंनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला नाही, कुणालाही पाठीशी घाला, असं टिंगरे म्हणाले नाहीत' असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. 'आमदाराच्या मतदारसंघात जेव्हा कुठली घटना घडले तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तो तेथे जात असतो. सुनील टिंगरे देखील त्यासाठीच तेथे गेले होते.' असं म्हणत अजित पवार यांनी टिंगरेंचा बचाव केलाय. 

तसंच मी पोलीस आयुक्तांना पुण्यातील केससंदर्भात एकही फोन केला नसल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. ते पुढे म्हणाले की, दोन मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर तपासाची चक्र फिरली.या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलिसांचे निलंबण करण्याते आले आहे. ससूनमधील दिरंगाई करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. परदेशात असणारे मंत्री हसन मुश्रीफ यांनी वेळोवेळी या घटनेची माहिती घेतली.

अजित पवार यांची प्रतिक्रिया 

शिवाय मुश्रीफांनी कारवाईचे आदेशही दिले. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जात नाही. ही घटना जशी सर्वांनी गंभीर घेतली आहे तशीच सरकारने ती गांभीर्याने घेतली आहे, असं अजित पवार म्हणालेत.