Pune Auto Rickshaw Protest: पुण्यातील रिक्षा आंदोलनाला गालबोट; हडपसर, कात्रज परिसरात धक्कादायक प्रकार!

Pune News: आंदोलनात जे रिक्षाचालक संपात सामील झाले नाहीत. त्यांच्या रिक्षा आडवून प्रवाशांना खाली उतरवलं जातंय. संपात सहभाग न घेतल्याने काचा फोडण्यात गेल्या.

Updated: Nov 28, 2022, 07:10 PM IST
Pune Auto Rickshaw Protest: पुण्यातील रिक्षा आंदोलनाला गालबोट; हडपसर, कात्रज परिसरात धक्कादायक प्रकार! title=
Pune Auto Rickshaw Protest

Pune Auto Rickshaw Protest: बाईक टॅक्सीविरोधात पुण्यात (Pune) रिक्षाचालकांचा आज बंद पुकारला होता. काही दिवसांपासून रिक्षाचालकांचं RTO कार्यालयासमोर आंदोलनं देखील (Auto Rickshaw Protest) केली होतं. तसेच उपोषण देखील केलं. त्यानंतर आता तर नागरिकांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागतोय. पुण्यातील सुरू असलेल्या रिक्षा आंदोलनाला गालबोट (Protest violence) लागल्याचं पहायला मिळतंय.

आंदोलनात जे रिक्षाचालक संपात सामील झाले नाहीत. त्यांच्या रिक्षा आडवून प्रवाशांना खाली उतरवलं जातंय. संपात सहभाग न घेतल्याने काचा फोडण्यात गेल्या. तसेच (Pune News) रिक्षाला बाजूला घेतलं जातं. हा सर्व प्रकार पुण्यातील उपनगरामध्ये सुरू असल्याचं पहायला मिळतंय. 

आणखी वाचा - शाळेत सरस्वती पूजेची गरज काय? त्यांनी किती शाळा काढल्या?; छगन भुजबळांचे विधान

संपाच्या पार्श्वभूमीवर PMPML कडून जास्तीच्या बस रस्त्यावर उतरवण्यात आल्या आहेत. पुण्यात सुरु असलेलं रिक्षा आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. संपकरी रिक्षाचालकांनी रस्त्यावर सुरु असलेल्या रिक्षांच्या काचा फोडल्या आहेत. बघतोय रिक्षावाला (baghtoy Rickshawala) यांसह संघटनेसह इतर 12 संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

पाहा व्हिडीओ - 

दरम्यान, काही रिक्षाचालक आंदोलनात सहभागी न होता रिक्षा चालवत होते. तेव्हा संपकरी रिक्षाचालकांनी या रिक्षा अडवत त्याच्या काचा फोडल्या. पुणे उपनगरात हे प्रकार घडलेले आहेत. हडपसर (Hadapsar), वडगाव तसंच कात्रज (Katraj) परिसरातले व्हिडिओ समोर आलेत. रिक्षा पंचायतसारख्या बाबा आढावांची (baba Adhav) संघटना आजच्या रिक्षा आंदोलनात सहभागी झालेली नाही. ज्या रिक्षा संघटनांचा समावेश नाही. त्यांच्या रिक्षा फोडल्याचं दिसतंय. त्यामुळे आंदोलनाला गालगोट लागल्याचं पहायला मिळतंय.