...म्हणून रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळला; चंद्रपूर दुर्घटनेतील मृत महिलेच्या नातेवाईकाचा धक्कादायक खुलासा

बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे नक्की कोणत्या फलाटावर येणार याची कुठलीच निश्चित माहिती दिली जात नाही. अत्यंत वर्दळीच्या या स्थानकावर पाच फलाटांपैकी रेल्वे कुठे येणार याची प्रतीक्षा करत हजारो प्रवासी एकाच वेळी पादचारी पुलावर थांबून राहिल्याने अपघात ओढवल्याचा दावा मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला.

Updated: Nov 28, 2022, 07:08 PM IST
...म्हणून रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळला; चंद्रपूर दुर्घटनेतील मृत महिलेच्या नातेवाईकाचा धक्कादायक खुलासा title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर :  रेल्वे स्थानकावर पादचारी पूलचा(footover bridge) स्लॅब कोसळल्याची(Slab collapsed) धक्कादायक घटना रविवारी चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यातील बल्लारपूर(Ballarpur) रेल्वे स्थानकात घडली होती. या प्रकरणी रेल्वेचा गलथानपणा कारणीभूत असल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी रेल्वे प्रशासनावर केला आहे. 

बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे नक्की कोणत्या फलाटावर येणार याची कुठलीच निश्चित माहिती दिली जात नाही. अत्यंत वर्दळीच्या या स्थानकावर पाच फलाटांपैकी रेल्वे कुठे येणार याची प्रतीक्षा करत हजारो प्रवासी एकाच वेळी पादचारी पुलावर थांबून राहिल्याने अपघात ओढवल्याचा दावा मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला.

नीलिमा रंगारी या 48 वर्षीय शिक्षिकेचा बल्लारपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या पादचारी पूल कोसळल्याच्या घटनेत मृत्यू झाला. या मृत्यूने क्षमतेहून अधिक वर्दळ असलेल्या बल्लारशासारख्या देशातील अनेक स्थानकांवर रेल्वे सुविधांची पोलखोलच झाली आहे. मयत कुटुंबाला जुजबी मदत देत वेळ मारून नेण्याएवढा हा प्रश्न क्षुल्लक आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे.

दुर्घटना नेमकी कशी घडली?

रविवारी ही दुर्घटना घडली तेव्हा काजीपेठ पॅसेंजर स्थानकावर येणार असल्याने प्लॅटफॉर्म प्रवाशांनी भरून होता. काही प्रवाशांना ओव्हरहेड वायरच्या अतिउच्च दाबाचा स्पर्श झाल्याने त्यांना गंभीर इजा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. 
या फुटओवर ब्रिजची उंची जवळपास 60 फूट होती. याचाच अर्थ अपघात झाला त्यामुळे लोकं 60 फूटांवरून थेट रेल्वे ट्रॅकवर पडले. काजीपेठ पुणे एक्स्प्रेस पकडण्यासाठी अनेक प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून 4 कडे जात होते. त्याचवेळी अचानक या पुलाचा काही भाग कोसळला.